24 November 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

पडळकर पुन्हा वादात, गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्ताने चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो

MLA Gopichand Padalkar, Troll, Lokmanya Tilak, Gopal Ganeh Agarkar

मुंबई, १४ जुलै : काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसहित भाजप नेत्यांनी सुद्धा पडळकरांना सुनावले होते.

यावर गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची आता गरज नाही. पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होते.

त्यानंतर गोपीचंद पडळकर आता दुसऱ्या वादात अडकले आहेत. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आगरकरांऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला, त्यानंतर सोशल मीडियात याबाबत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली असं सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. नेटिझन्सने हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली, लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले आहे. यानंतर गोपीचंड पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचं दिसून आलं असं सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: Gopichand Padalkar used a photo of Lokmanya Bal Gangadhar Tilak instead of Agarkar in his post on the occasion of the birth anniversary of great social reformer Gopal Ganesh Agarkar.

News English Title: MLA Gopichand Padalkar Troll after posting a photo of Lokmanya Tilak on Gopal Ganeh Agarkar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x