21 November 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रात आमदार फुटणार नाही, फुटलाच तर ३ पक्षांच्याविरुद्ध निवडूनच येणार नाही - जयंत पाटील

Maha Vikas Aghadi, Minister Jayant Patil

मुंबई, १४ जुलै : राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

दुसरीकडे अशोक गहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी १०५ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच पायलट यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहेत. मात्र यानंतर महाराष्ट्रात देखील आमदार फोडले जातील अशी राजकीय सुरु झाली आहे. मात्र या सर्व चर्चा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. सरकारमधील आमदार फुटलाच तर फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिल. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: In Maharashtra too, there is a political trend that MLAs will be fired. However, all these discussions have been rejected by the Minister and NCP leader Jayant Patil. Jayant Patil said that not a single MLA of Mahavikas Aghadi will split in Maharashtra and even if he split, he will not be elected in front of the strength of three parties.

News English Title: The Maharashtra Vikas Aghadi government in the state is strong, said Minister Jayant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x