22 November 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

धारावी पॅटर्न राबवा ही सूचना आ. राजू पाटील यांनी १० एप्रिलला दिली होती, सरकारला जुलैमध्ये जाग

Dharavi Pattern, KDMC, Covid 19, Corona Virus

कल्याण, १५ जुलै : कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीची दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेऊन शाबासकी दिल्यानंतर आता धारावीचा हा पॅटर्न कल्याण-डोंबिवली महापालिकाही राबवणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीच ही माहिती दिली आहे. धारावी पॅटर्नने हाताबाहेर गेलेला कोरोना महापालिका रोखणार आहे. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण-डोंबिवलीत दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे हादरलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात केलेल्या तपासणीत कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची अलगीकरणात रवानगी, त्यांची स्वॅब टेस्ट करुन १० दिवसात कोरोनाचा रुग्ण शोधून काढून शहरातील कोरोनाचा प्रसार रोखला जाणार आहे. यासाठी उपायोजना करण्यात येत असून लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. कल्याण-डोंबिवलीतील मोजकेच नगरसेवक कोरोना काळात नागरिकांची सेवा करत होते. त्यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आवाहनाला नगरसेवक किती प्रतिसाद देतात हा एक प्रश्नच आहे.

मात्र हा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. कारण विरोधकांच्या सूचना केवळ गृहीत धरण्याची प्रवृत्ती महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा असल्याचं दिसतं आहे. त्यात कल्याण-डोंबिवली म्हणजे शिंदे पिता-पुत्र ठरवतील ती पूर्व दिशा असा प्रशासनाचा तोरा, पण त्याची झळ कल्याण-डोंबिवलीच्या सामान्य लोकांना बसली आहे. कारण धारावी पॅटर्न कल्याण-डोंबिवलीत राबवावा अशी सूचना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी १० एप्रिल रोजीच दिली होती. त्याबाबत सरकारला वेळीच सतर्क करताना आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं की, “आज कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यानंतर देखील टेस्टिंग लॅब, ट्रेसिंग, उपचार हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीये अशी खंत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील बोलून दाखवली आहे. त्या निमित्ताने त्यांनी कोरोना बाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत असल्याने, मुंबईतील धारावीत जशी सरकारच्यावतीने पाहणी करण्यात आली तशी कल्याण-डोंबिवलीत देखील करण्यात यावी अशी मागणी केली होती.”

 

News English Summary: After the World Health Organization (WHO) commended Dharavi for its success in preventing corona, the Kalyan-Dombivali Municipal Corporation will now follow Dharavi’s pattern. Municipal Commissioner Dr. This information has been given by Vijay Suryavanshi himself.

News English Title: Dharavi Pattern implementation in KDMC to control covid 19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x