22 November 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

रशियानंतर अमेरिकेतील मॉर्डना कंपनीकडून कोरोना लस बाबत आनंदाची बातमी - सविस्तर वृत्त

Moderna, Phase 1 results, covid 19 vaccine, Corona Virus

वॉशिंग्टन, १५ जुलै : जगभरात कोरना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. आता याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. करोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली.

आता या लसीचे अखेरचे परीक्षण केले जाणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मंगळवारी आलेल्या रिपोर्टमधून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे, या लसीकडून वैज्ञानिकांना जी अपेक्षा होती, अगदी त्याच प्रकारे या लसीने लोकांच्या इम्यून सिस्टिमवर काम केले आहे. या चाचणीमध्ये ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. अमेरिकन संशोधकांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्या स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले, त्यांच्या शरीरात व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीजची मोठया प्रमाणात निर्मिती झाल्याचे दिसून आले. करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात जितक्या अँटीबॉडीज आहेत, त्यापेक्षा हे प्रमाण जास्त होते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

तर एपी या वृत्त संस्थेशी बोलताना, अमेरिकन सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉसी म्हणाले, ‘ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. ही प्रायोगिक लस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्ना इंक एकत्रितपणे तयार करत आहेत. या लसीचे सर्वात आवश्यक आणि अखेरच्या टप्प्यावरी परीक्षण 27 जुलैच्या जवळपास होईल.

महत्त्वाचं म्हणजे मॉडर्नाची ही लस दिल्यानंतर गंभीर साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. लस घेणाऱ्या निम्म्या स्वयंसेवकांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपांची लक्षणे दिसली. थकवा, डोकेदुखी, थंडी, स्नायुंचे दुखणे आणि इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे अशा तक्रारी स्वयंसेवकांनी केल्या. रशियाने विकसित केलेली लस घेतल्यानंतरही काही स्वयंसेवकांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या.

मॉर्डनाच्या लसीचा दुसरा डोस आणि खासकरुन जास्त क्षमतेचा डोस घेतल्यानंतर ही लक्षणे दिसून आली. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लस ही संपूर्ण जगाची गरज बनली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगात लाखो लोक बाधित झाले असून जगभरात पाच लाख ७५ हजार नागरिकांनी आपले प्राण गमावेल आहेत.

करोना लसीची मानवी चाचणी सुरु करणारी मॉर्डना जगातील पहिली कंपनी आहे. १६ मार्चलाच मॉर्डनाने लसीची चाचणी सुरु केली होती. या बातमीनंतर मंगळवारच्या सत्रात मॉर्डनाचा शेअर १५ टक्क्यापेक्षा जास्त वधारला. अमेरिकन सरकारनेही ऑपरेशन वार्प स्पीड़ अंतर्गत मॉर्डनाला लस निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. वर्षअखेरपर्यंत लस बाजारात आणण्याचे अमेरिकेचे उद्दिष्टय आहे. त्या दृष्टीने फक्त मॉर्डनाच नाही अन्य कंपन्यांनाही अमेरिकेने लस निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

 

News English Summary: Vaccines for the Corona virus are being tested around the world. Now the results of these vaccines are also coming to the fore. Now Moderna Inc. has been added to the chain. Scientists are delighted with the results of tests on the first two phases of COVID-19, which was first tested in the United States.

News English Title: Moderna Phase 1 results show covid 19 vaccine safe induces immune response News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x