22 November 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, थोड्याच वेळात या वेबसाईट्सवर पहा

State Xii, Result Announced, Online

मुंबई, १५ जुलै : बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.

कोकण विभागाने (HSC Result 2020) निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.८९ इतका आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के इतका आहे.

कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
MCVC : ९५.०७ टक्के

उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटवर होणार निकाल जाहीर;

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर आकडेवारी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.

ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय़ांव्यतिरिक्त) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: Finally, the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the results of HSC i.e. Class XII examinations. The results will be announced on Thursday, July 16, 2020 at 1 P.M.

News English Sammary: State Xii Results Will Be Announced Online Tomorrow 16 July News Latest Updates.

हॅशटॅग्स

#HSCBoard(4)#SSC(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x