22 November 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

राज्यात आज ७ हजार ९७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, १५ जुलै : राज्यातील करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात सध्या १ लाख ११ हजार ८०१ इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दुसरीकडे, केंद्र शासनाकडून पुरवण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मागील चोवीस तासांमध्ये कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नव्यानं तब्बल २०,५७२ रुग्णांनी कोरोना व्हायरसवर मात केल्यामुळं आता या संकटाला सामोरं जाऊन यशस्वीपणे कोरोनाचा नायनाट करणाऱ्या देशातील एकूण रुग्णांचा आकडा ५९१०३१ वर पोहोचला आहे. परिणामी देशभरात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा आता ६३.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

 

News English Summary: Today, there is an increase of 7 thousand 975 infected patients in the state. As a result, the total number of patients in the state has reached 2 lakh 75 thousand 640. Today, 3,606 new infected patients have been cured.

News English Title: Today there is an increase of 7 thousand 975 infected patients in the Maharashtra News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x