22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन

Researchers, IIT Delhi, Cost covid test, kits to diagnose

नवी दिल्ली, १६ जुलै : कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोलामधून ऑनलाईन केले.

मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या किटची किंमत केवळ ३९९ रुपये इतकी माफक आहे. मात्र बाजारातील विक्रीवेळी या निदान किटची किंमत ६५० रुपये राहील. तसेच या निदान किटच्या माध्यमातून अवघ्या ३ तासांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळवता येईल, असा दावा आयआयटी दिल्लीने केला आहे. यामध्ये जर या निदान किटला यश आले तर देशाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बाब ठरणार आहे. आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या निदान किटची निर्धारित किंमत ३९९ रुपये, आरएनए किट १५० रुपये आणि बाजारातील किंमत ६५० रुपये अशी असणार आहे.

शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असून हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्याव्या असे आवाहनही धोत्रे यांनी यावेळी केले.

 

News English Summary: Researchers at IIT Delhi have developed low cost covid test kits to diagnose covid patients. It is accredited by the Indian Council of Research (ICMR).

News English Title: Researchers at IIT Delhi have developed low cost covid test kits to diagnose covid patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x