22 November 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

इयत्ता ८वीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखाबाबत बालभारतीचं स्पष्टीकरण

Balbharti Marathi Book, Wrote Kurban Hussain, Sukhdev, 8th Standard Chapter

पुणे, १७ जुलै : राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात मोठी चूक झाल्याचं उघडकीस आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नात हा उल्लेख आहे.

सदर वाक्य नेमकं काय आहे ?
“भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”.

दरम्यान धड्याच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातून हा धडा घेण्यात आला आहे. पुस्तकालील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या धड्यातून उलगडण्यात आला आहे.

दरम्यान यावर बालभारतीने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, “लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील लेख जसाच्या तसा आठवीच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकात वापरण्यात आला आहे. त्यांच्या पुस्तकातील मुळ मांडणीच तशी आहे. आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा उल्लेख आहे. त्यांच्यासारखेच कुर्बान हुसेन हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सोलापूरमध्ये त्या काळी वृत्तपत्र सुरू केले होते. भाषेच्या पुस्तकातील या उल्लेखाच्या संदर्भातील अधिक तपशील, पुरावे मिळवण्यात येत आहेत,” अशी माहिती बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

News English Summary: More details and evidence are being obtained regarding this reference in the language book, ”said Balbharati director Vivek Gosavi while talking to media.

News English Title: Balbharti Marathi Book Wrote Kurban Hussain Instead Of Sukhdev In 8th Standard Chapter News latest Updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x