शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून विक्री, मराठी युवकाचा 'Next Fresh' ब्रॅण्ड नफ्यात
नवी मुंबई, १७ जुलै: जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, ‘रडायचे नाही लढायचे’, हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.
असाच धैर्य आणि किमया करून दाखवली आहे किरण सावंत या मराठी तरुणाने असंच म्हणावं लागेल. लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या संधीचा फायदा उचलत किरण सावंत या मराठी तरुणाने ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि थेट त्यांच्याकडून खरेदी केलेली भाजी आणि फळं ‘Next Fresh’ या ब्रॅण्डच्या नावाने नवी मुंबईकरांना घरपोच देणारी सेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे किरण सावंतने सुरु केलेल्या उद्योगातून १० तरुणांना देखील रोजगार मिळाला आहे. उद्योग सुरु केल्यापासून किरणने एकूण भांडवलाच्या मोबदल्यात तब्बल ५ लाखाच्या आसपास निव्वळ नफा कमावला आहे. किरण सावंत हा नवी मुंबईस्थित महाराष्ट्र सैनिक असल्याचं समजतं. त्यामुळे मराठी तरुणांची आज छोटीशी सुरुवात असली तरी देखील भविष्यात ‘Next Fresh’ नावाचं मोठं ईकॉमर्स ब्रँड उदयास आल्यास नवल वाटायला नको. गरज आहे केवळ सातत्य, मेहनत आणि चिकाटी न डगमगता कायम ठेवण्याची असंच म्हणावं लागेल.
News English Summary: Taking advantage of the opportunity created by the lockdown, Kiran Sawant, a young Marathi man, contacted 400 farmers and started a home delivery service for Navi Mumbaikars under the brand name ‘Next Fresh’.
News English Title: Marathi Youngster Kiran Sawant has developed his own brand Next Fresh in Navi Mumbai News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS