22 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा - राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी

Iran President Rouhani, Covid19, Corona Virus

तेहरान, १८ जुलै : इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी टीव्हीवर देईल. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

८ कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तिथे उद्रेक झाला होता. राष्ट्रपती हसन रूहानी यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात देशातल्या ३.५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना होऊ शकत अशी भीती व्यक्त केली.

इराणमध्ये आत्तापर्यंत १४ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही हजार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मागील दोन महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाने इराणमध्ये हाहाकार केला होता. मृतदेह पुरण्यासाठी अनेक मैदानांमध्ये कबरी खोदण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शेकडो भारतीय अटकले होते त्या सगळ्यांना समुद्र आणि हवाई मार्गाने भारतात आणण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी इराणमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याचा मोठा फटका तिथल्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.

 

News English Summary: President Hassan Rouhani has said that 2.5 million people in Iran are affected by the Corona. Rouhani will report on TV that 2 lakh 71 thousand 606 patients tested positive in Iran in one day on Saturday.

News English Title: Rouhani Warns 25 Million Infected As Iran Reimposes Restrictions News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x