राज्यात आजपर्यंत एकूण १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग
मुंबई, १८ जुलै : कोरोना व्हायरसची दहशत राज्यात कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच १ लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर पडली. तर १४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,००,९३७’वर गेली आहे. तर एकूण मृत्यू ११५९६ एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज ११८६ नवे रुग्ण आढळले तर ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या १,००,३५० एवढी झाली. तर आत्तापर्यंत ५६५० जणांचा मृत्यू झाला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या टप्प्यावर आहे. यात आता चिंतेची बाब म्हणजे राज्यात बालकांना होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. राज्यात १० हजार ६३९ बालकांना कोरोना झाला आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.७६ टक्के आहे. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर ही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात एक महिन्यांपूर्वी १८ जून रोजी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ३ हजार ८६६ बालकांना कोरोना झाला आहे. तर १८ मे रोजी हे प्रमाण १ हजार ५९ इतके होते. त्यामुळे दिवसागणिक बालकांच्या आऱोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, एकूण कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी अभ्यासली असता, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या नसतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा आणि अन्य काही आजार नसतात. त्यांची फुप्फुसेही चांगल्या परिस्थितीत असतात. राज्यात १० हजारांहून अधिक लहान मुले कोरोनाने संक्रमित झाले आहेत. मात्र, त्यांचा बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे.
News English Summary: The number of corona patients in the state is at three lakh. Of concern now is the increase in corona infections among children in the state. 10 thousand 639 children have been corona in the state.
News English Title: Worrying Corona infection in more than 10000 children in the state News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा