22 November 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात

milk agitation started, Milk Producer Farmers

नगर, २० जुलै : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाव १६ ते १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.

तसेच दररोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवरही दगडाला दुधाचा अभिषेक करुन केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. दरम्यान, भाजपाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर देण्याची मागणी केली जाणार आहे.

दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे.

डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

 

News English Summary: Dairy farmers in Maharashtra are facing financial crisis and milk prices have come down to Rs 16-18. Against this backdrop, farmers’ unions and opposition parties have taken to the streets to demand an increase in milk prices.

News English Title: The milk agitation started in the state, the central and state government protested by anointing the stone News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x