22 November 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार, पण नियम...

Konkan, Ganapati festival, ST Mahamandal, Minister Anil Parab, Covid19

मुंबई, २० जुलै : कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला होता. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं होतं. पण आता चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.

केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरूप पाठवणार आणि परत आणणार असल्याचे आश्वासन आमदार अनिल परब यांनी दिलंय. त्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडलेल्या चाकरमान्यांना कोकणात एसटीनं प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी त्यासाठी काही नियमावलीचं पालन देखील करावं लागणार आहे.

“मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे” असे अनिल परब यांनी सांगितले.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे स्पष्टीकरण आधीच दिले होते. चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले होते.

तर दुसरीकडे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

 

News English Summary: Minister Anil Parab assured that he would send the Konkani peoples back to Konkan safely and bring them back. Therefore, employees who have questions about how to travel will be able to travel by ST in Konkan. In any case, some rules have to be followed for that.

News English Title: Good news for Konkan people in Ganapati festival from ST Mahamandal News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x