22 November 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

नागपूर: PPE किट घालून तुकाराम मुंडेंनी थेट कोरोना रुग्णांशी संवाद साधला

Nagpur Coronavirus, Tukaram Munde, wear a PPE kit, Corona patients

नागपूर, २१ जुलै : कोरोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहेत.

दुसरीकडे कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ३००० चा आकडा पार केला आहे. नागपुरात काल आणखी ६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूरच्या कामठी तालुक्यात पुन्हा १३ रुग्ण आले पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नागपुर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनात संघर्ष होत असल्याचंही चित्र आहे. तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोरोना रुग्णांची भेट घेतल्यानंतरही तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला ताबोडतोब आदेश दिले.

तुकाराम मुंढे यांनी स्वतः PPE KIT घालून आयसोलेशन वार्डात जावून रुग्णांशी संवाद साधला. येथील परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना सूचना व दिशानिर्देश दिले. यावेळी स्वतः तुकाराम मुंढे यांच्यासह डॉक्टर अविनाश गावंडे आणि डॉ.फैजल उपस्थित होते. शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summary: On the backdrop of Corona Thaimana, Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe recently visited Government Medical Hospital and Indira Gandhi Government covid Hospital.

News English Title: Nagpur Coronavirus Tukaram Munde wear a PPE kit and interacted directly with corona patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x