राम मंदिराचे भूमिपूजन, पण अडवाणी अजूनही आरोपीच...शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
मुंबई, २२ जुलै : येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणाऱ्यांसाठी श्रद्धांजली ठरेल’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय गदारोळ पाहण्यास मिळत आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या एनओसीची गरज नाही, असं म्हणून टीका केली आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून ‘रामायण’ या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे.
अयोध्या ही रामाचीच. उझबेकिस्तानमधून आलेल्या बाबराने हिंदू देवळे उद्ध्वस्त केली. त्यातून रामजन्मभूमीही सुटली नाही. त्यामुळे बाबराचा अयोध्येशी संबंध हा आक्रमणापुरताच होता. ते आक्रमण आणि बाबरीचे अतिक्रमणही लाखो कारसेवकांनी उद्ध्वस्त केले. त्यात शिवसेना होती. अनेकांचे योगदान त्यात आहे. आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते आडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा! बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही. या सर्व अडचणींवर मात करून 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. अयोध्या त्या दिवशी सजेल. श्रीरामराज्याभिषेक झाला तो आनंदाचा क्षण अनुभवेल. कोरोनाचे संकट नसते तर लाखो रामभक्तांनी अयोध्या बहरली असती. 5 ऑगस्टला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन होईल. मंदिराच्या कळसाचा मुहूर्तही शोधलाच असेल. रामायणास अंत नाही, ते सुरूच असते!
News English Summary: State Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray has been invited to pay homage to the Ram temple. Therefore, political turmoil is being witnessed. BJP leaders have criticized Uddhav Thackeray for not needing Sharad Pawar’s NOC.
News English Title: Shivsena demands cancellation of Babri case against Lalkrushana Advani Samana News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार