22 November 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

राज्य सरकार विरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा

Marath Kranti Morcha, Maratha reservation

औरंगाबाद, २२ जुलै: मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचं रमेश केरे पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठी क्रांती मोर्चाच्या काळात काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणानं नदीत जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचं आक्रमक रुप बघायला मिळालं होतं. त्याच्या स्मृतिदिनीच हे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, क्रांती मोर्चा आंदोलनावर ठाम आहे.

 

News English Summary: The Maratha Kranti Morcha has now announced a ‘self-sacrifice’ movement. Coordinator of Maratha Kranti Thok Morcha Ramesh Kere Patil has informed that Maratha activists are determined to hold agitation at Kayagaon Toka tomorrow (July 23).

News English Title: Marath Kranti Morcha Call Agitation For Many Demands News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x