22 November 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लॉकडाउनमधील परकीय गुंतवणुक सांगताच नेटिझन्स म्हणाले, देशात नाही अंबानी समूहात

Prime Minister Narendra Modi, India Idea Summit America, Mike Pompeo S, Jaishankar

नवी दिल्ली, २२ जुलै : अमेरिका भारत बिझनेस कॉउन्सिल इंडिया आयडिया समिट मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर सर्वाधिक भर देत जगाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

पंतप्रधान म्हणाले की, जगाला चांगल्या भविष्याची गरज आहे हे आपण सर्वजण मान्य करतो. आपल्या सर्वांनाच एकत्रितरित्या भविष्याला आकार द्यायचा आहे. भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन मुख्यत: अधिक मनुष्य-केंद्रित असणे आवश्यक आहे.” भारतात अनेक संधी उपलब्ध असून अमेरिकन कंपन्यांसाठी गुंवणुकीचे पर्यायही उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची प्रतीक्षा करत आहोत,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “आपल्याला देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढवण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त आर्थिक संस्थांनाही बळकट करण्याची गरज आहे. आज संपूर्ण जग हे भारताकडे पाहत आहे. भारतात संधी आणि तंत्रणाचा ताळमेळ आहे,” असंही ते यावेळी म्हणाले. तसेच लॉकडाउनमध्ये देखील देशात तब्बल २० बिलियन अमेरिकन डॉलर परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र यावर नेटिझन्सनी ती गुंतवणूक भारतात नव्हे तर अंबानींच्या समूहात झाल्याचं सांगत त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली.

 

News English Summary: Prime Minister Modi was speaking at the India Idea Summit of the American India Business Council. He said that there are many opportunities available in India and investment options are also available for American companies.

News English Title: Prime Minister Narendra Modi Addresses India Idea Summit America Mike Pompeo S Jaishankar Business Investment Option News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x