22 November 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच, शासनाकडून मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश

UGC, CBSE Board, ISCE Board, SSC Board, HSC Board

मुंबई, २३ जुलै : कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाई शिक्षणातून पाचवीपर्यंतच्या वर्गांना सूट देण्यात आली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. तसा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात १५- १५ मिनिटांचे दोन वर्ग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्य शिक्षण विभागाकडून १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तारखाही जाहीर करुन देण्यात आल्या आहेत. आता, या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काही मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने देऊ केल्या आहेत. त्याचा, अध्यादेशही २२ जुलै रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज ३० मिनिटे ऑनलाईन क्लास घेण्यात येईल. त्यामध्ये, पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करु नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने यू-टर्न घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शिक्षण विभागाने बुधवारी नवीन परिपत्रक जाहीर केले. आता पूर्व प्राथमिक आणि पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ४५ मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ४५ मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात नमूद म्हटले आहे.

 

News English Summary: Online learning lessons will also be available for classes up to class II. 30 minutes of online learning is allowed. It is suggested to take two classes of 15 minutes each.

News English Title: Ordinance of guidelines from the government for online education of students News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x