22 November 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

राज्य निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने BJP IT सेल संबंधित कंपनीला नियुक्त केलं होतं?

RTI Saket Gokhale, Election Commission, Hired BJP IT Cell, Maharashtra Assembly Election

मुंबई, २४ जुलै : महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतली असून याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून आरोपांप्रकऱणी सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

माजी पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. गुरुवारी संध्याकाळी पोस्ट केलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये गोखले यांनी नमूद केलं की, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या काही जाहिराती पाहताना लक्षात आलं की त्या पत्त्यात मुंबईतील विलेपार्ले येथील कार्यालयाचा पत्ता आहे.

ते म्हणाले, “पत्ता २०२ प्रेस मॅन हाऊस, विलेपार्ले, मुंबई होता. तो कोणाचा पत्ता आहे हे शोधण्याचं मी ठरवलं. तर ती कंपनी निघाली साइनपोस्ट इंडिया, जी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या अखत्यारीत चालवली जाणारी संस्था होती.”

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये पुढे म्हटलं की, “पण थांबा – ही अर्धी गोष्ट नाही आहे. २०२ प्रेस मॅन हाऊस पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला होता. ही एजन्सी देवांग दवे यांच्याकडे आहे, जे भाजप युवा संघटना, बीजेवायएमचे आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.”

दरम्यान, हा आरोप देवांग दवे यांनी फेटाळला आहे. माझ्या प्रतिष्ठेवर डाग लावण्यासाठी पूर्णपणे निराधार आरोप केले गेले आहेत. कारण मी अत्यंत नम्र मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो आहे. माझ्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मी पुढे जात आहे म्हणून काही लोक जळत आहेत आणि मला लक्ष्य करीत आहेत. मी कायदेशीर कारवाई करेन. दरम्यान, साकेत गोखले यांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय, या खुलाशानंतर सीईओ महाराष्ट्र काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

News English Summary: A company affiliated to the BJP IT cell has been accused by the state’s Chief Election Commission official of appointing a company for the Assembly elections held in Maharashtra last year. It is claimed that the company was hired for social media promotion.

News English Title: RTI Saket Gokhale Claims Election Commission Hired Bjp Linked Firm For Promotion During Maharashtra Assembly Election News latest Updates.

हॅशटॅग्स

#ElectionCommission(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x