वर्दीतील देव माणूस करतोय चहाविक्रेत्या मुलाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत

मुंबई, २४ जुलै : कोरोना महामारी आणि मुंबईकर यांच्या मध्ये भिंत बनवून उभे राहणारे कोरोना योद्धे म्हणजेच पोलीस कर्मचारी यांना कोरोना महामारीची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे भीषण चित्र मुंबईत निर्माण झाले आहे. मुंबईकरांसाठी गेले चार महिने लढणाऱ्या अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच प्रमाणे आतापर्यंत या कोरोना योध्यांपैकी अनेक पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर आणि कंटेनमेंट झोनबाहेर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कोरोना योध्यांपैकी ३,५२० जणांना कोरण्याची लागण झाली असून आतापर्यंत ५२ कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना देखील पोलिसांमधील माणूस इतरांना समजून घेताना दिसत असून, अडचणीतील लोकांना शक्य ती मदत देखील करत आहेत.
मुंबईच्या वरळी येथील पोलीस कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ओंकार व्हनमारे यांनी दादर (माटुंगा) येथे एका १४ वर्षीय चहाविक्रेत्या मुलाला शैक्षणिक साहित्य घेऊन घेण्यासाठी मदत केली. तसेच, आपला मोबाईल नंबर देऊन, यापुढेही शिक्षणासाठी मदत हवी असेल तर कॉल करा, असे आधारही दिला. महाराष्ट्र पोलीस वर्दीतला माणूस या फेसबुक पेजवर यासंदर्भातील बातमी शेअर करण्यात आली. त्यानंतर, थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पोलीस बांधवाच्या कामाचं कौतुक केलं आहे. आल्या ट्विटर अकाऊंटवरुन गृहमंत्र्यानी ओंकार व्हनमारे यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलंय.
परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते,जिद्द तेव्हाच जन्माला येते. @MumbaiPolice दलातील संवेदनशील पोलीस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि घरी आजारी असणाऱ्या आईसाठी चहा विकणाऱ्या सागर माने या मुलाला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. (१/२) pic.twitter.com/o3ucwdF51G
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 24, 2020
परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते,जिद्द तेव्हाच जन्माला येते. मुंबई पोलीस दलातील संवेदनशील पोलीस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि घरी आजारी असणाऱ्या आईसाठी चहा विकणाऱ्या सागर माने या मुलाला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. भविष्यात शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क कर, असा विश्वासही व्हनमारे यांनी सागरला दिला. मला होतकरू, कष्टाळू व परिस्थितीची जाणीव असणाऱ्या सागरचे आणि त्याला मदत करणाऱ्या व्हनमारे यांचे खूप कौतुक वाटते, असे गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
News English Summary: The news was shared on the Maharashtra Police Uniform Manus Facebook page. After that, Home Minister Anil Deshmukh directly praised the work of this policeman. From his Twitter account, the Home Minister said that he appreciated the sensitivity of Omkar Vanmare.
News English Title: The help given by the police constable for the education of the tea boy, was directly noticed by the Home Minister News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL