22 November 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारतात विकसित केलेल्या कोरोना लसीची AIIMS मध्ये मानवी चाचणी सुरू

Covid19 Vaccine, First Dose, Bharat Biotech, Covaxin

नवी दिल्ली, २४ जुलै : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जगभरात विविध स्तरावर लस बनवण्याचे संशोधन सुरू आहे. भारतानेही COVAXIN लस विकसित केली असून त्यांच्या मानवी चाचणीला दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये सुरूवात झाली आहे. एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. इंडिया टुडेला एम्स हॉस्पिटलमधील सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे समजते. या स्वयंसेवकाला दोन तास हॉस्पिटलमध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार असून यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

 

News English Summary: A human trial of the COVAXIN vaccine developed in India has been started at AIIMS Hospital. The 30-year-old volunteer has been given the first dose of this indigenous vaccine.

News English Title: Coronavirus First Dose Of Bharat Biotech Covaxin Given To Volunteer In AIIMS News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x