22 November 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सरकारकडून हालचाली नाही, गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसे गाड्या सोडणार

Ganeshotsav 2020, MNS Party, Bus service, Visiting Konkan

मुंबई, २५ जुलै : कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला आहे. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरूप पाठवणार आणि परत आणणार असल्याचे आश्वासन आमदार अनिल परब यांनी दिलं होतं. त्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडलेल्या चाकरमान्यांना कोकणात एसटीनं प्रवास करता येणार असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाता येणार की नाही यावर अद्यापही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने केवळ एसटी सोडणार असल्याची घोषणा केली असून पुढील हालाचील केला नसल्याचा आरोप करत आता कोकणवासियांना कोकणात सोडण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. येत्या ४ ऑगस्टपासून मनसेतर्फे गाड्या सोडण्यात येणार असून त्याची बुकींग १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिली.

संदीप देशपांडे म्हणाले की, ‘गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील गणेशभक्त मोठ्या संभ्रमात आहेत. गावाला गेल्यावर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार की ७ दिवस हा घोळ अजून संपलेला नाही. राज्यातील अकार्यक्षम सरकार कुठलाही निर्णय घेण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीतही नाही.’

त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी गाड्या सोडा अशी मागणी सातत्याने मनसेकडून होत होती. त्यावर केवळ एसटी महामंडळानं आम्हाला आश्वासन दिल्याचं देशपांडे म्हणाले. तसेच, एसटी सोडणार असल्याची घोषणा झाल्यावरही दृष्टीनं कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. आम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे म्युनिसिपल कर्मचारी सेना येत्या ४ ऑगस्टपासून कोकणात जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करणार आहे. सर्व चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. येत्या १ ऑगस्टपासून बसेसचं बुकिंग सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

 

News English Summary: The MNS has now taken the initiative to release the people of Konkan, alleging that the state government has only announced that they will leave ST and no further action has been taken. The trains will be released by MNS from August 4 and the booking will be done from August 1.

News English Title: Ganeshotsav 2020 MNS Party to provide bus service to those visiting Konkan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x