22 November 2024 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

डिझेलचे दर पुन्हा वाढले, लॉकडाउनमधील प्रवास महागणार..नवीन दर पाहा

Petrol, Diesel Rates

मुंबई, २५ जुलै : तेल कंपन्यानी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढविले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढविले आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फळं आणि भाज्यांमधील इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.

तेल कंपन्यांनी जुलै महिन्यात केवळ डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. डिझेलच्या दरात १.४५ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्याच्या किंमतीत अखेरची वाढ २९ जून रोजी झाली होती, तीदेखील प्रतिलिटर फक्त ५ पैसे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ८०.४३ रुपये असताना डिझेल ८१.७९ रुपयांवर गेले. दिल्ली हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कायम आहे. मात्र, मंगळवारीच कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलपेक्षा एका डॉलरने वाढले आहेत. त्यावेळी दोन्ही इंधनाचे दर सलग चार दिवस स्थिर होते. मात्र, आज डिझेल १५ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे.

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीच्या वाढीचा परिणाम संपूर्ण देशात एकाच वेळी दिसून येईल. यामुळे एफएमसीजी कंपन्यांवरील दबाव वाढेल आणि त्यांना किमती वाढविण्यास भाग पाडले जाईल. फळ आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वाहतुकीचा वाटा इतर वस्तूंच्या तुलनेत जास्त आहे. फळांच्या बाबतीत परिस्थिती काही वेगळी आहे. वेगवेगळ्या राज्यातून फळं दिल्लीत आणली जातात. यानंतर त्यांचे वितरण संपूर्ण देशात केले जाते. अशा परिस्थितीत मालवाहतूक वाढल्यामुळे फळांच्या किंमतींमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.

 

News English Summary: Oil companies have hiked diesel prices by keeping petrol prices stable. Oil companies have raised diesel prices nine times this month. Diesel prices in Delhi have reached historic highs. Consistent price rises are likely to push inflation further.

News English Title: Petrol remains stable diesel again rises by 15 Paise per litre News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x