22 November 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

शपथविधीसाठी उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, राज्यपालांचे पत्र

Maharashtra Governor, Bhagat Singh Koshyari, Vice President M Venkaiah Naidu, Advisory

मुंबई, २५ जुलै : नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे/आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य आणि गांभीर्य जतन करण्यासाठी अश्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचं नमूद केलं आहे.

महाराष्ट्रात मंत्रिपदाची शपथ घेताना काही सदस्याना आपण शपथ लिहिली आहे त्याच स्वरुपात कोणतीही नावं न जोडता पुन्हा वाचण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. त्याचंही स्मरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पत्रामध्ये केलं आहे. शपथेच्या प्रारुपानुसार फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या विचार विनिमय करुन सर्व संबंधितांना सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has requested that a set of guidelines / code of conduct be laid down for all concerned in this regard stating that some newly elected Members of Parliament as well as Members of the Legislative Assembly are taking oath without adding the names of their party leaders and dignitaries in the prescribed format.

News English Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Has Requested Vice President M Venkaiah Naidu And Lok Sabha Speaker Om Birla To Come Up With An Advisory News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MaharashtraGovernor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x