22 November 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली...प्रश्न काय आणि उत्तर भलतीच - निलेश राणे

BJP Former MP Nilesh Rane, CM Uddhav Thackeray, Saamana interview

मुंबई, २६ जुलै : शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी वादाचा विषय ठरलेल्या बुलेट ट्रेनबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतो. तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय. त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलंय. तसंच मुंबई नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल.

दरम्यान मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी या मुलाखतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.”

 

News English Summary: In the interview, Uddhav Thackeray answered many questions. Opposition groups called for a boycott of the assembly. BJP leader Nilesh Rane has ridiculed Chief Minister Uddhav Thackeray and MP Sanjay Raut over the interview.

News English Title: BJP MP Nilesh Rane criticized CM Uddhav Thackeray over questions asked during interview News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x