21 November 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

एक भावाला लवकर उठण्याचा सल्ला; दुसऱ्या भाऊ आपत्तीत सुद्धा घरी तरी गोड कौतुक? - सविस्तर वृत्त

Sharad Pawar, CM Uddhav Thackeray, corona crisis, Raj Thackeray

मुंबई, २६ जुलै : कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॅप्टन असं संबोधित करत त्यांची पाठराखण केली. काल शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यावर मत व्यक्त केलं होतं.

पुढे बोलताना पवार म्हणाले होते की, “मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळेच मला राहावत नाही म्हणून मी संकटकाळातही बाहेर जात असतो,” असं पवार यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती.

मात्र पवारांच्या या पाठराखण करण्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे हे वास्तव आहे. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले होते की पक्ष वाढवायचा असेल तर सकाळी लवकर उठायला हवं. मात्र आज संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना आपत्तीने धुमाकूळ माजवलेला असताना देखील राज्याचे कॅप्टन म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडताना दिसत नाही. किंबहुना संपूर्ण प्रशासन सध्या ते ऑनलाईन चालवत आहेत हे वास्तव आहे. आजारपणाच्या कुरबुरी या सर्वच घरात असताना देखील सामान्य माणूस देखील पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे कॅप्टन घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देणारे डॉक्टर झाल्याचा साक्षात्कार काल महाराष्ट्राला झाला तो संजय राऊत यांच्या तोंडून.

मुंबईतील कोविड सेंटर उभारणीच्या प्राथमिक स्थितीत असताना आणि सुरक्षेच्या दृष्टीने सोपी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना धावत्या भेट देऊन घराबाहेर पडत असल्याचं दाखवलं, मात्र दुसऱ्या बाजूला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री दौरे करत असताना मुख्यमंत्री पूर्णपणे डिजिटल झाले आहेत हे वास्तव आहे. अगदी विरोधकांनी देखील कोरोना आपत्तीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मात्र मुख्यमंत्री एका जागी बसून राज्य चालवत आहेत. दुसरीकडे काही महानगरपालिकेचे आयुक्त देखील PPE किट घालून थेट कोविड रुग्णांच्या भेटीला गेल्याच देखील पाहायला मिळालं. मात्र राज्यातील लोकांना कोरोनाला घाबरू नका असा संदेश देणारे मुख्यमंत्री अघोषितपणे स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त असल्याची टीका आता विरोधकांकडून सुरु झाली आहे.

उद्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी कॅप्टन उद्धव ठाकरे यांचं अनुकरण करून एकाच ठिकाणी म्हणजे घरी बसून कामं हाताळण्याचा कार्यक्रम सुरु केला तर काय वेळ ओढवेल याचा विचार न केलेलाच बरा आणि त्याची जाणीव पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने मुख्यमंत्र्यांना करून देणं गरजेचं आहे. आज बाहेर आरोग्य व्यवस्थेत काय गोंधळाचं वातावरण आहे याची मुख्यमंत्र्यांना जाणीव नसावी आणि त्यामुळेच मुंबईची “डिजिटल पाहणी” करणाऱ्या WHO’च्या ट्विटवरून ते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. राज्यात प्रतिदिन २००-२५० रुग्णांचा मृत्यू होतं असताना देखील मातोश्रीवर राजकीय प्रतिउत्तरांसाठी “मुलाखत फिक्सिंगचे” उद्योग हसत खेळत सुरु आहेत आणि ते सामान्य लोकांना समजत नाहीत या अविर्भावात सध्या खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहाटे उठून आपत्तीत तरी घराबाहेर पडा असा सल्ला देण्याची वेळ आली आहे.

 

News English Summary: NCP’s Sarvesarva Sharad Pawar had expressed the view that the captain should sit in one place and pay attention to the entire team. Sharad Pawar visits all places in times of crisis.

News English Title: Sharad Pawar should advice to CM Uddhav Thackeray over corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x