ठाकरे सरकारचा भीषण कारभार, क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना एक्सपायर्ड डेटेड मेडिसिन
जालना, २६ जुलै: राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर काल २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे. काल मुंबईत १ हजार ९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता आता १ लाख ७ हजार ९८१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७८ हजार ८७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात सर्वत्र भीषण स्थिती झालेली असताना ग्रामीण भागातून धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. जालन्यात क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना एक्सपायर्ड डेटेड cipcovit forte व्हिटॅमिन गोळ्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. क्वारंटाइन असलेल्या महिलेने गोळ्याच्या पाकिटावर असलेली मुदत पहिल्यानंतर गोळ्या घेण्यास विरोध केल्यानंतर ही बाब सामोर आली आहे. जालना जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना ही बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं आहे. जालना शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतीगृहात ४८ रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना या एक्सपायर्ड डेटेड cipcovit forte व्हिटॅमिन गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या सुनंदा सुरटे या महिला रुग्णाची एक किडनी निकामी आहे. त्यांना या गोळ्या दिल्यानंतर त्यांनी गोळ्यावर असलेली मुदत पहिली. नंतर त्यांनी गोळ्या घेण्यास विरोध करत मला या गोळ्या चालत नाही, असे सांगितलं. मात्र तरी देखील त्यांचं कुणीही ऐकलं नाही. अखेर सुनंदा सुरटे यांनी नातेवाईकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला. याबाबत नातेवाईकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अद्याप या प्रकरणाची कुणीही दखल घेतली नसल्याचं सुनंदा सुरटे यांनी सांगितलं आहे. जालना जिल्ह्यात सद्या कोरोनानी थैमान घातलं आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1764 वर पोहोचली आहे. तर 59 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
News English Summary: While the situation is dire everywhere in the state, shocking types are emerging from the rural areas. Corona patients undergoing treatment at the quarantine center in Jalna have come across a shocking pattern of being given expired dated cipcovit forte vitamin pills.
News English Title: Expired dated tablet to corona patients at Jalna quarantine center News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार