23 November 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, Reaction, CM Uddhav Thackeray, Amit Shah

मुंबई, २७ जुलै : राज्यातील साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही,” असा टोला लगावत फडणवीसांनी भेटीमागील कारण सांगितलं.

आज झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखती राऊत यांनी देवेद्रे फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यासंबंधी प्रश्न केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना “त्यांना गृहमंत्री आदेश बांदेकर कार्यक्रम करतात, तसे वाटले असतील होम मिनिस्टर,” असं म्हटलं होतं.

 

News English Summary: Devendra Fadnavis, Leader of Opposition in the state, had met Union Home Minister Amit Shah on issues related to the sugar industry in the state. Sanjay Raut, the executive editor of the match, had asked Chief Minister Uddhav Thackeray about the meeting. Devendra Fadnavis has replied to Thackeray’s reply.

News English Title: Devendra Fadnavis Reaction on CM Uddhav Thackeray Comment About Amit Shah News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x