उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमकच नाही, आठवलेंची खोचक टीका
मुंबई, २७ जुलै : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील १८ खासदारांच्या जीवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे.
रामदास आठवले आज नवी मुंबईतील वाघवली गावात असणाऱ्या बौद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. याठिकाणी विकास प्रकल्पासाठी सिडकोमार्फत बौद्ध लेणी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर आज रामदास आठवले यांनी बौद्ध लेण्यांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
News English Summary: There is no threat of Uddhav Thackeray becoming the Prime Minister, said Union Minister Ramdas Athavale. He was speaking to the media in Navi Mumbai on Monday. He was asked to comment on the talk that Uddhav Thackeray would be active in national politics.
News English Title: CM Uddhav Thackeray do not have capability to become Prime Minister says Ramdas Athawale News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार