22 November 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राम मंदिर भूमिपूजनाबाबतची उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ही शिवसेनेच्या अधःपतनाची तयारी - विंहिप

Hindutva Party, Vishwa Hindu Parishad, Uddhav Thackeray, Bhoomi Pujan

नवी दिल्ली, २७ जुलै : राम मंदिर भूमिपूजनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या अधःपतनाची तयारी असून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ढोंगीपणाचं असल्याची टीका विंहिपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केली आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावं असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतरच वादाची ठिणगी पडली होती.

याबाबत विश्व हिंदू परिषदेने अधिकृतपणे पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे विधान ऐकून आश्चर्य वाटले, फक्त अंध विरोधाच्या भावनेतून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय सूचवला आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वावादी राजकारणाची भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं? अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

राम मंदिराच्या निर्माणावरुन देशात अनेक राजकीय वादळं आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे.

 

News English Summary: Vishwa Hindu Parishad has criticized the statement made by Chief Minister Uddhav Thackeray on Ram Mandir Bhumi Pujan. Uddhav Thackeray’s statement on Bhumi Pujan of Ram Mandir is a preparation for Shiv Sena’s downfall and Uddhav Thackeray’s statement is hypocritical.

News English Title: Blind Opposition Fall Of Hindutva Party VHP Fumes Over Uddhav Thackerays E Bhoomi Pujan Suggestion News latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x