24 November 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मनसे कार्यकर्ते वीज कंपन्यांविरोधात हात सोडण्याच्या आधीच मंत्रालयात तातडीची बैठक

Raj Thackeray, Electricity Bills, Meeting at Mantralaya, Minister Anil Parab

मुंबई, २८ जुलै : राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. राज ठाकरेंनी याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखं असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

त्यानंतर झोपेतून जाग आलेल्या सरकारने मंत्रालयात तातडीची बैठक बोलाविल्याचं वृत्त आहे. आज यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात बिलं वाढली त्याची वस्तुस्थिती मांडली आणि ग्राहकांना दिलासा मिळालाच पाहिजे अशी मागणी केल्याचे अनिल परब बैठकीनंतर म्हणाले. बिलं कशी जास्त आली आहेत ते वीज कंपन्यांच्या अधिकार्‍यांना दाखवून दिलं. यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. कोण कोणत्या स्टाईलने आंदोलन करतं माहित नाही आम्ही सरकार जनतेच्या बाजूने आहोत असेही परब म्हणाले.

वीज कंपन्यांनी बदललेले स्लॅब पूर्ववत करावेत यासाठी वीज नियामक आयोगाशी चर्चा केली जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यूझीलंडला असल्याने ते उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत. म्हणून उद्या याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले.

 

News English Summary: In this regard, a meeting was held in the office of Deputy Chief Minister Ajit Pawar at the Ministry today. Eknath Shinde, Anil Parab, Varsha Gaikwad, Jitendra Awhad were present at this meeting. It was informed after the meeting that the state government was trying to provide relief to the consumers through increased electricity bills.

News English Title: Extra electricity bills to customers as power companies change slabs tomorrow state government will discuss News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x