22 November 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

पवार साहेबांचं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावरील त्यांचा राग सुद्धा वाढतो आहे - निलेश राणे

Former MP Nilesh Rane, Sharad Pawar, Ram Mandir

मुंबई, २८ जुलै : अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.

दरम्यान, आता याबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे, राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही, सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, पवारांच्या याच विधानावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं MIM पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय.”

 

News English Summary: However, everyone not reacting because of Sharad Pawar’s age, but as he gets older, Pawar Saheb’s anger towards Hindu Dharma seems to be increasing.

News English Title: Former MP Nilesh Rane criticized Sharad Pawar over latest statement on Ram Mandir News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x