22 November 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

सुखोई, जग्वार, मिराज, मिग, तेजस ही चायनीस खेळणी असल्याप्रमाणे माध्यमांचा राफेल खेळ

Indian Air Force, Fighter Jet Rafale, ]Ambala Air Base

नवी दिल्ली, २९ जुलै : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आला होता आणि ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा ५ राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचली आहेत. २७ जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही ५ विमाने भारताच्या दिशेने झेपावली होती.

सोमवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनॅक एअर फोर्स तळावरुन राफेल विमानांनी उड्डाण केले होते. भारतात दाखल होण्याआधी अल धफ्रा एअर बेसवर एकादिवसासाठी ही विमाने थांबली होती. आज दुपारी राफेल विमाने भारतात दाखल झाली आहेत.भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.

२०१६ साली भारताने फ्रान्स सरकारबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यानुसार पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

दुसरीकडे काल पासून भारतीय माध्यमांनी याच राफेलवरून अक्षरशा हौदोस घातल्याचं पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मोठी चर्चा रंगल्याच पाहायला मिळत आहे. भारतीय प्रसार माध्यमांची राफेलबद्दलची बोंबाबोंब पाहता यापूर्वीची सुखोई, जग्वार, मिराज, मिग, तेजस अशी आधुनिक लढाऊ विमानं ही चायनीस खेळणी होती का असा प्रश्न पडला आहे. वारंवार त्याला चीनचा जोडला जाऊ लागल्याने या वृत्तांवर हसावं की रडावं असाच प्रश्न पडला आहे.

लंडन स्थित आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयएसएस) जगातील सशस्त्र दलांचा वार्षिक आढावा घेतला आहे. यामध्ये जगभरात विकसित देश असताना सुद्धा “सैनिकी संतुलनात” चीनने सर्वांना धोबीपछाड दिला आहे आणि त्यात भारत आजूबाजूला देखील नाही. जगातील मोठ्या लष्करी शक्तींमध्ये चीनचा आधुनिकीकरणाचा वेग सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना पश्चिम पॅसिफिकमधील अमेरिकेच्या सैनिकी सामर्थ्याला आव्हान देण्यास सक्षम लष्करी क्षमता उभी केली आहे. प्रतिवर्षी जीडीपीमधील ६-७ टक्के हिस्सा खर्च करण्यात चीनने सातत्य राखलं आहे आणि त्याचा त्यांना लष्करी सामर्थ वाढविण्यात मोठा फायदा झाला आहे. आयआयएसएसने केलेल्या अभ्यासात चीन लष्करी तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण बनला आहे आणि ती पाश्चिमात्य देशांची मोठी अडचण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे चीफ सेक्रेटरी माईक पॉम्पेओ यांनी चीनचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, “आज आपण झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनसमोर दयेची भीक मागावी लागेल”. म्हणजे चीनच्या सामर्थ्याला अमेरिका आणि अमेरिकेची माध्यमं देखील नाकारत नाहीत.

भारतात मात्र ३ लढाऊ तर २ प्रशिक्षित अशा ५ राफेल विमानांच्या आगमनानंतर जे सुरु आहे, त्यावरून हे देशाला लाभलेलं पहिलं लढाऊ विमान असल्याचं २०-२२ वर्षीय तरुणांना वाटू लागलं आहे. आणि आता चीनला घरात घुसून मारणार असं वाटू लागलं आहे आणि ते बिंबविण्यात प्रसार माध्यमं महत्वाची भूमिका बजावत आहेत. वास्तविक भारतीय लष्कर अत्याधुनिक होणं गरजेचं आहे, मात्र त्यात वस्तुस्थितीकडे डोळेझाक होऊ नये हेचप्रामाणिक तज्ज्ञाचं मत आहे. कारण अशा मृगजळ निर्माण करणाऱ्या वृत्तांमुळे देशातील नव मतदार फसले जातात, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुख्य लक्ष असतात.

 

News English Summary: It has been seen that the Indian media has literally made a fuss over this Raphael and as a result, there is a lot of discussion on social media. The Indian media’s propaganda of Raphael raises the question of whether the earlier Sukhoi, Jaguar, Mirage, MiG, Tejas and other modern fighter jets were Chinese toys.

News English Title: Indian Air Force New Fighter Jet Rafale Lands At Ambala Air Base News latest Updates.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x