कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर - मुख्यमंत्री
पुणे, ३० जुलै : कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेले कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला असून ५ लाखांचा टप्पा पार करण्यात आलाय. वरळी, धरावी इतके कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आलंय. पण मदतीचा ओघ येण्याच्या बाबतीत पालिका मागे पडलेली दिसतेय. पालिकेने कोरोनासाठी आतापर्यंत ७०० कोटींवर खर्च केलाय. तर गेल्या चार महिन्यात पालिकेला केवळ ८६ कोटींची मदत मिळालीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असताना इतक्या कमी मदतीमध्ये कसे काम करणार ? असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या ४ महिन्यांत मुंबई पालिकेला कोरोनासाठी एकूण ८६ कोटी ५ लाख ३० हजार ३०३ रुपये मिळाले. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी ७२.४५ कोटी रुपये दिले आहेत. मिळालेल्या एकूण निधीपैकी ८४ टक्के इतकी ही रक्कम आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी११.४५ कोटी तर वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ ५० लाख रुपये दिले.
खासगी लोकांनी ३५.३२ लाख रूपयांचे सहाय्य केले. आमदारांकडून केवळ १.२९ कोटी इतकी भर यामध्ये पडली. ते देखील ७ आमदारांनीच यासाठी पुढाकार घेतला. केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणती मदत यासाठी मिळाली नाही.
News English Summary: The financial condition of all the Municipal Corporations in the state including Pune has become critical. Against this backdrop, the state government is seeking funds from the Center. We are also providing as much assistance as possible through the state government.
News English Title: The Financial Situation Of All The Municipal Corporations In The State Is Critical Due To corona Says CM Uddhav Thackeray News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News