29 April 2025 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

लॉकडाऊन पाळू नका, सर्व दुकानं उघडा, माझ्यावर गुन्हा दाखल करा - प्रकाश आंबेडकर

Lockdown, Aurangabad, Corona Virus, Prakash Ambedkar

औरंगाबाद, ३१ जुलै : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा,’ असं आवाहन त्यांनी दुकानदारांना केलं आहे. त्याचवेळी ‘पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही,’ असं म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिलं आहे.

‘देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केलं आहे.

जे हाल परराज्यातील कामगारांचे झाले तेच हाल लहान लहान उद्योजकांचे होत आहेत. लोकांची उपासमारीची परिस्थिती आली आहे. ८० कोटी कुटुंबांना अन्नधान देऊ म्हणले होते मात्र ते वाटलेलं काही दिसत नसल्याचं ते म्हणाले. कोरोना संदर्भात सत्य स्थिती मांडायला राज्य किंवा केंद्र शासनाकडे राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

भूकबळी आणि इतर आजारामुळे लोक मरत आहेत. हे लॉकडाऊन चक्रामध्ये दोन्ही शासन स्वतःहून अडकलेत. बाहेर पडण्याचा रास्ता त्यांना दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा असं आवाहन त्यांनी शासनाला केलंय.

 

News English Summary: Prakash Ambedkar, the leader of the Deprived Bahujan Alliance, has once again taken an aggressive stance against lockdown. ‘Don’t accept the lockdown. Open all the shops in the state from the 1st, ‘he appealed to the shopkeepers. At the same time, arrest me if you want.

News English Title: Break the Lockdown and open all shops in the state from August 1 Prakash Ambedkar became aggressive News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या