26 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत - फडणवीस

Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti, Devendra Fadnavis, Mahavikas Aghadi

मुंबई, १ जुलै : राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. यावेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे असे आवाहन राज्य सरकार पाटील यांनी यावेळी केले.

पाटील म्हणाले,महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही, कर्जमाफी देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते मिळाली नाही, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाचविण्यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. आतापर्यत केंद्र सरकारने राज्याला मदत केली नाही, अशी गरळ ओकणाऱ्या आघाडी सरकारला केंद्राने मोठे अनुदान दिले आहे. आतातरी राज्यसरकारने कोरोना हद्दपार केले पाहिजे.

 

News English Summary: Leaders of Mahavikas Aghadi are accusing the central government of importing milk powder. However, the central government has not imported a single gram of milk powder. Fadnavis also criticized farmer leader Raju Shetty. Devendra Fadnavis claimed that Raju Shetty has now become a government agitator.

News English Title: Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti is a government agitator Devendra Fadnavis harsh criticism News latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x