19 April 2025 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

सुशांत प्रकरण: आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडून महाराष्ट्राला बदनाम करताय - राऊत

Sushant Singh Rajput case, Sanjay Raut, Aaditya Thackeray

मुंबई, ५ ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवं वळण मिळालं आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप सुरू असून, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलीस महासंचालकांनी सुशांतच्या वडिलांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यामुळं आता आम्ही या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करत आहोत असं म्हटलं होतं.’

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण लोक आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे याचा लवकरच स्फोट होईल. सुशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभ्रदी असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्यापद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्राविरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान, हे प्रकरण बिहारविरुद्ध महाराष्ट्र रंगवलं जात आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावं असं म्हणतात त्यांनी सीबीआय कशाला ट्रम्प यांच्या सीआयएकडे द्यावं, पुतीन यांच्याकडे द्यावं, युनोमध्ये प्रश्न उठवा, हा सर्व मुर्खपणा सुरु आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत, जगाचा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. इथलेच राजकीय नेते पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. महाराष्ट्राशी इतकी बेईमानी याआधी कुणी केली नव्हती असा घणाघात राऊत यांनी विरोधकांवर केला आहे.

 

News English Summary: Sanjay Raut said that the people who are accusing Aditya Thackeray will soon explode. Politics is happening in Sushant’s case. The screenplay is being written behind the scenes.

News English Title: Who conspiring to discredit the Thackeray family in the Sushant Singh Rajput case It will explode soon Sanjay Raut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या