22 November 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोविड-१९ सेंटरला आग, ८ रुग्णांचा मृत्यू

Gujarat, Shrey hospital, Ahmedabad,  Covid Care Center, Fire

अहमदाबाद, ६ ऑगस्ट : भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ जणा करोनामुक्त झाले आहेत.

दुसरीकडे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, काही रुग्णांना कोविड सेंटरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती देण्यात आलेय.

कोविड-१९ सेंटरला आग लागल्याची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आले आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली त्यावेळी आरडा-ओरडा किंकाळ्यांचा आवाज येत होता. कोणाला काय झालेय, हेच समजत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अनेक रुग्णांनी पळापळ करण्यात सुरुवात केली.

मृतांची नावे –

  1. अरविंद भावसार
  2. नवीनलाल शाह
  3. लीलावती शाह
  4. आयशाबेन तिरमीश
  5. मनुभाई रामी
  6. ज्योति सिंधी
  7. नरेंद्र शाह
  8. आरिफ मंसूर

 

News English Summary: Eight patients have died in a fire at the Kovid-19 center in Ahmedabad, Gujarat. The fire broke out in the ICU ward of Shreya Hospital in Navrangpura area, officials said.

News English Title: Gujarat eight people have died in fire which broke out at Shrey hospital in Ahmedabad today morning News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x