22 November 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही, एम्सचा प्राथमिक निष्कर्ष

Covid19, Corona Virus, Plasma Therapy, AIIMS Research

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट : कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीमध्ये विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर लस नाही, आवश्यक अँटिव्हायरल औषधांचा तुटवडा अशा परिस्थिती प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) आशेचा किरण ठरत आहे. कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत असल्याचं लक्षात घेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणं बंधनकारक करावं, अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेने महाराष्ट्र सरकारला केली होती.

प्लाझ्मा थेरेपीच्या उपयुक्ततेबाबत महाराष्ट्रातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी करण्यात आली होती. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागत आहे, आयसीयूमध्ये दाखल करावं लागत आहे, अशा रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनरक्षक म्हणून प्रभावी ठरल्याचं दिसलं आहे. तरीदेखील राज्यातील विविध रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जात नाही. प्लाझ्मा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागत आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तदान करणं बंधनकारक करावं, अशी मागणी महाराष्ट्र IMA ने केली होती.

दरम्यान प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही असा निष्कर्ष एम्सने काढला आहे. एम्सकडून प्लाझ्मा थेरपी उपचार किती प्रभावी आहे याची तपासणी करण्यासाठी चाचणी करण्यात आली. यावेळी प्लाझ्मा थेरपीमुळे करोना रुग्णांचा मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही असं समोर आल्याचं एम्सने सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयात १५-१५ रुग्णांच्या दोन गट करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामधील एका ग्रुपला प्रमाणित उपचारांसोबत प्लाझ्मा थेरपी तर दुसऱ्या ग्रुपला फक्त प्रमाणित उपचार देण्यात आले. मात्र दोन्ही गटांमधील मृत्यूसंख्या सारखीच राहिली. सोबतच दोन्ही गटातील रुग्णांच्या प्रकृतीतही काही खास सुधारणा झाली नाही. “पण हा फक्त प्राथमिक निष्कर्ष असून एखाद्या विशेष समूहाला प्लाझ्मा थेरपीचा फायदा मिळतोय का हे तपासण्यासाठी अजून सविस्तर विश्लेषण कऱण्याची गरज आहे,” असं डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: The AIIMS concludes that plasma therapy does not significantly reduce the risk of death. Plasma therapy from AIIMS was tested to see how effective it is. This time, plasma therapy did not significantly reduce the risk of death for corona patients, the AIIMS said.

News English Title: Coronavirus AIIMS Trial Interim Analysis No Benefit Of Plasma Therapy In Reducing Mortality Risk News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x