22 November 2024 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुशांतसिंह प्रकरण | बिहार पोलीस अधिकारी विनय तिवारींची क्वारंटाईनमधून मुक्तता

Mumbai Municipal Corporation, quarantined SP Vinay Tiwar, Bihar Police

मुंबई, ०७ ऑगस्ट : बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन ठेवण्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याताना महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, म्हणूनच त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले, असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

त्यानुसार आता विनय तिवारींना डिस्चार्ज देण्यात आले आहे. ८ ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने त्यांना केली आहे. लॉकडाउन नियमावलीनुसार, सात दिवसात एखाद्या अत्याआवश्यक कामासाठी आलेली व्यक्तीला मुळगावी जाता येते. पण सात दिवसाचा न परतल्यास त्या व्यक्तीस चाचणी करणे तसेच पुढील सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. या नियमांनुसार, विनय तिवारींना दोन दिवसांत मुंबई सोडावी लागेल, असे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation has quarantined SP Vinay Tiwar of Patna in Bihar. Vinay Tiwari, who had come to investigate the suicide of actor Sushant Singh Rajput, was quarantined by the BMC on the background of corona.

News English Title: Mumbai Municipal Corporation has quarantined SP Vinay Tiwar of Patna in Bihar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x