22 November 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नवं शैक्षणिक धोरण | मोदींनी शिक्षणातील मातृभाषेचं महत्व सांगितलं

Prime Minister Narendra Modi, New Education Policy, Mother Language

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट : भविष्याचा विचार करुनच नवं शिक्षण धोरण तयार करण्यात आलं असून नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक देश आपलं ध्येय लक्षात ठेऊन बदल करत पुढे जात असतो. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामागे हाच विचार असल्याचंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नव्या शिक्षण धोरणावर आपलं मत मांडलं. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबतची भूमिका आज देशवासीयांसमोर मांडली. यावेळी मोदींनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले.

शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या परिषदेत नव्या शैक्षणिक धोरणावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, तीन चार वर्षे चाललेल्या वैचारिक मंथनानंतर नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. आज प्रत्येक विचारसरणीचे लोक यावर चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे या शैक्षणिक धोरणाला कुणीही विरोध केला नाही. कारण यात काहीही एकतर्फी नाही आहे. आता एवढ्या मोठ्या सुधारणेला वास्तवात कसे आणायचे याचा विचार सर्वजण करत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपलं मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पाहायला मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, आमच्या युवकांमध्ये वेगळा विचार विकसित होण्यासाठी शिक्षणाचा हेतूही बदलण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तीन ते चार वर्ष चर्चा केल्यानंतर तसंच लाखोंच्या संख्येने आलेले सल्ले लक्षात घेऊनच राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आलं आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर केले जाईल. हे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी जी मदत हवी असेल ती केली जाईल. मी तुमच्यासोबत आहे. शैक्षणिक धोरणामध्ये देशाच्या लक्ष्यांना विचारात घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यातील पिढी तयार करता येईल. हे शैक्षणिक धोरण नव्या भारताची पायाभरणी करेल. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

आज शिक्षणक्षेत्रात बदल होत आहेत. बदलत्या वेळेसोबत जगदेखील बदलत असून नवे जागतिक मापदंड तयार होत आहेत. हे लक्षात घेता आपल्या शिक्षण धोरणात बदल करणं गरजेचं होतं. शालेय अभ्यासक्रमात 10+2 ऐवजी 5+3+3+4 ची रचना करणं हा त्याचाच एक भाग आहे. घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा एकच असल्याने मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो यामध्ये काही दुमत नाही. यामुळेच पाचवीपर्यंत शक्य झाल्यास मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवण्याची परवानगी दिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

News English Summary: Narendra Modi presented the role of the new education policy to the people today. This time, Modi has explained the reason behind teaching children in their mother tongue. Modi said that emphasis was being laid on imparting education in the mother tongue to increase the sweetness of education among the children.

News English Title: Prime Minister Narendra Modi On New Education Policy News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x