22 November 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, 8 ऑगस्ट : जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका एवढा झाला आहे. राज्यात आज 11081 रुग्णांना घरी डिस्चार्ज दिला, आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात आज एक लाख 47 हजार 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे असून त्यानंतर 22943 ठाणे येथे आहेत. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

राज्यात सध्या नऊ लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच काही दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाचा रिकव्हरी रेटही वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

News English Summary: The number of taxpayers in the state has now crossed 5 lakh. As many as 12,822 new coroners were found in the state today and 275 people have died.

News English Title: 12822 Covid19 Cases 275 Deaths Reported In Maharashtra Today News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x