22 November 2024 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

१७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा आनंद - पंतप्रधान

PM Narendra Modi, financing facility, Agriculture infrastructure fund

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज या योजनेची सुरुवात केली. कृषी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सवलतीच्या कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निधीतून कृषी पायाभूत सुविधा निधीच्या स्थापनेला केंद्राने जुलैमध्ये मान्यता दिली. शेतक-यांच्या उत्पादनांच्या चांगल्या देखभालीसाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा निधी उभारण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 20 लाख कोटींच्या स्वयंपूर्ण पॅकेजदरम्यान ही घोषणा केली होती.

मागील दीड वर्षात ७५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi today launched the scheme through video conferencing. In July, the Center approved the setting up of an Agriculture Infrastructure Fund out of a fund of Rs 1 lakh crore for concessional loans for agricultural infrastructure projects.

News English Title: PM Narendra Modi launches financing facility under agriculture infrastructure fund News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x