22 November 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पायलट जमिनीवर | राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीनंतर घरवापसीची शक्यता

Congress Leader Sachin Pilot, Meets, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Rajasthan

जयपूर, १० ऑगस्ट : राजस्थानात विधीमंडळाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच राजकीय हालचालींची गती वाढली आहे. पक्षासोबत बंडखोरी करणारे सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सांगितले जात आहे की तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक राहिली. अशात सचिन पायलट यांना पुन्हा पक्षात रुजू करण्यामध्ये प्रियांका आणि राहुल गांधी यशस्वी राहिल्याचे संकेत आहेत.

१४ ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याची संकेत देण्यात आले आहेत. आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष उफाळून आला होता. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.

प्रियांका आणि राहुल यांच्या भेटीनंतर सचिन पायलट राग सोडून पुन्हा पार्टीत सहभागी होतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यापूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती, तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासोबत अनेकदा फोनवर चर्चा केली आणि प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला.

 

News English Summary: Sachin Pilot, the former Rajasthan deputy chief minister who triggered a breakaway from the ruling Congress in the state, reached out to the party leadership in Delhi and held a meeting with Rahul Gandhi on Monday, according to two senior leaders aware of the developments.

News English Title: Congress Leader Sachin Pilot Meets Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra News latest Updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x