खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लुटमार | ठाकरे सरकार लूटमार रोखण्यात असमर्थ
मुंबई, ११ ऑगस्ट : एकाबाजूला राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
असाच प्रश्न आमच्या सरकारच्या काळात आला तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूधखरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते.दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच. या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ही लढाई संपेस्तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणावर लूट सुरु असल्याने देखील फडणवीसांनी संताप व्यक्त केला.
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच आहेत,दुसरीकडे राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही.केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे.या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून,त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही pic.twitter.com/8NJE3BKvVk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 11, 2020
राज्यातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून खुलेआम सुरु असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
केवळ सर्वसामान्य करोना रुग्ण खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा होणाऱ्या लुबाडणुकीबाबत बोलत नाही तर सत्ताधारी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही याबाबत बोलत आहेत. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी तर याबाबत पालिका आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. अन्यत्र राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. गेले जवळपास पाच महिने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. काही रुग्णालयात तर दिवसाचे उपचाराचे बिल पन्नास हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
News English Summary: Opposition in the legislature has claimed that the government has failed to curb the rampant looting of private hospitals in the state.
News English Title: Thackeray Government Unable To Curb Looting Of Private Hospitals Says Devendra Fadnavis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार