22 November 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुशांतच्या वडिलांबद्दलचं वक्तव्य | चूक झाली असेल तर विचार करावा लागेल - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Sushant Singh Rajput, Sushant Singh Father's Marriage

मुंबई, १२ ऑगस्ट : महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू, राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. तसेच मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत, तेच हे हा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन, त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सूचली असेल तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, या प्रकरणाला न्याय मिळो, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल तर मग केंद्रातलं सरकार पडेल. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे. पार्थ पवार यांची भूमिका वेगळी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले.

सुशांत सिंहच्या वडिलांच्या दोन लग्नावरुन केलेल्या वक्तव्यावर कुटुंबाने माफी मागण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सागितलं की, “कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही. जर चूक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत आहे”.

संजय राऊत यांनी राजस्थानमधील राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या ऑक्टोबरपर्यंतच सरकार टिकणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना प्रयत्न करु राहू देत असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शरद पवार तसंच सगळे मंत्री प्रयत्न कत आहेत. त्यातही कोणाला सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावं. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य द्यावं लागतं. प्रधानमंत्र्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राच्या हितावरच बोट ठेवलं होतं,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

 

News English Summary: Asked about the family’s apology for Sushant Singh Rajput’s father’s statement on two marriages, Sanjay Raut said he had no idea what the family was demanding. If something goes wrong, you have to think. I’m talking about what I know.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut On Sushant Singh Rajput Death Case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x