16 April 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

सचिन पायलट यांनी घेतली अशोक गेहलोत यांची भेट | काँग्रेसचा मार्ग मोकळा

Sachin Pilot, CM Ashok Gehlot, Special Session, Rajasthan Assembly

जयपूर, १३ ऑगस्ट – जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

काँग्रेस नेते सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशाबाबत चर्चा करण्यासाठी सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. राजस्थानात जी राजकीय उलथापालथ सचिन पायलट यांनी घडवली होती त्यानंतर ते वेगळी चूल मांडतील असं चित्र दिसत होतं.

मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे सचिन पायलट यांचं बंड शमलं. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. राजस्थान काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाळ्या सचिन पायलट यांच्या बंडानंतर पाहण्यास मिळाल्या. आता बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या अधिवेशनात काय रणनीती आखायची या चर्चेत ते सभागी झाले आहेत.

 

News English Summary: Congress leader Sachin Pilot has reached the residence of Rajasthan Chief Minister Ashok Gehlot. The Rajasthan Assembly session is starting from Friday. Sachin Pilot has reached Ashok Gehlot’s residence to discuss the convention.

News English Title: Sachin Pilot Reaches CM Ashok Gehlots Residence To Attend Congress Legislature Party Ahead Of The Special Session Of The Rajasthan Assembly News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या