22 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

बैठक संपली | शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, मुंडे, तटकरेंच मौन

Supriya Sule, Sharad Pawar, Dhananjay Munde, Sunil Tatkare

मुंबई, १४ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवार आता कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पार्थ प्रकरणात पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे.

पार्थ पवार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांशीही पार्थ चर्चा करणार आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. पार्थ यांची काल शरद पवार यांच्याशी भेट झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणा-या पवार कुटुंबात पार्थमुळे महाभारत सुरू आहे. हे वादळ कोणत्या टोकावर येऊन थंडावेल याचा अंदाज सध्या तरी लावणे कठीण झाले आहे. पार्थ पवारांच्या या भूमिकेमागे कोणाचा खरा चेहरा आहे याचाही अंदाज बांधण्यात तज्ञ व्यस्त आहेत.

त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक नुकतीच संपली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी मौन बाळगले आहे. माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता सुप्रिया सुळे गाडीतून निघून गेल्या तर, सुनिल तटकरे, धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांनी आम्ही आमच्या विभागाच्या कामासाठी शरद पवारांना भेटलो असल्याचे सांगितले.

एरवी थांबून माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणा-या सुप्रिया सुळे यांनीही आज पवारांसोबतच्या बैठकीनंतर मौन बाळगले. कुठलीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्यात. तर, कुणीही नाराज नाही, अजित पवार त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितलं. तर, धनंजय मुंडे म्हणाले, अजित पवार नाराज असण्याचा प्रश्नच नाही. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित चर्चा झाली. असे मुंडे म्हणाले. अजित पवार नाराज नाहीत, काही झाले नाही अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar’s son Partha Pawar still seems to be angry. After discussing with MP Supriya Sule, Parth Pawar will now discuss with other members of the family.

News English Title: Supriya Sules silence after meeting with Sharad Pawar but no answer from Dhananjay Munde and Sunil Tatkare News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ParthPawar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x