केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यात शाळांबाबत निर्णय | शिक्षणमंत्र्यांची माहिती
अहमदनगर, १७ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहावर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, १५ जूनला अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर तेथे मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. यामुळे केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. आता केंद्र सरकारच्या सूचना आल्याशिवाय राज्यात शाळा सुरू होणार नाहीत. शाळा सुरू करण्याबाबत पालक व शिक्षण संस्थांचा संमिश्र प्रतिसाद असून स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. १० वी व १२ वीच्या मुलांचे महत्वाचे वर्ष असून त्यांचा ताण कमी करण्यासाठी मुलांसोबत कनेक्टीव्हीटी वाढविण्याबाबत शिक्षकांनी प्रयत्न करावेत. फक्त स्मार्टफोनच नाही तर साध्या फोनमार्फतही शिक्षक मुलांशी संवाद साधून त्यांचा ताण कमी करू शकतात.
वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याच्या #शिक्षण विभागासोबत बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री #शंभूराजे देसाई, #आमदार अमित झणक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. @DesaiShambhuraj @CollectorWashim pic.twitter.com/Eu8dwl10or
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 16, 2020
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत देखील वक्तव्य केलं. “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत,” अशी प्रतिक्रिया राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “मुंबई पोलिसांची तुलना हे स्कॉटलँडच्या पोलिसांसोबत होते. त्याच मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केला जात आहे,” असेही त्या म्हणाल्या.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. याची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. त्यावर वर्षा गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, “मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे. ते सत्यता बाहेर आणतील,” असे त्या म्हणाल्या.
News English Summary: The decision to start schools in the state will be taken only after receiving the guidelines from the central government. However, we are making efforts so that the year of the students is not wasted, informed the Minister of School Education, Varsha Gaikwad.
News English Title: Decision on schools only after the suggestion of the Center, information of the Minister of Education Varsha Gaikawad News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News