22 November 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

देशात गेल्या २४ तासांत ५७,९८२ नव्या रुग्णांची नोंद | आजपर्यंत एकूण ५०९२१ रुग्णांचा मृत्यू

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट : भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.

कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. कुठे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं चित्र दिसत असतानाच लगेचच रुग्णसंख्येत होणारी वाढ प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यापुढं आव्हानं उभी करत आहे. अशा या परिस्थितीमध्ये सध्या चिंतेत टाकणारी बाब म्हणजे देशात कोरोनामुळं प्राण गमवावे लागेलल्यांची संख्या.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळं दगावलेल्यांची संख्या ५० हजारांच्याही वर गेली आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात ५०९२१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, मागील चोवीस तासांमध्ये ५७,९८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

 

News English Summary: Corona infection is on the rise in India. In the last 24 hours, 57,982 new coroners have been identified in the country. 941 patients have died. As a result, the total number of patients in the country has now crossed 26 lakhs.

News English Title: Spike Of 57982 Cases And 941 Deaths Reported In India In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x